पपई कोकोनट कुल्फी | वैशाली अडसूळे, बंगळूर | Papaya Coconut Kulfi | Vaishali Adsule, Bangalore

Published by वैशाली अडसूळे, बंगळूर on   August 2, 2021 in   2021Dessert Special

पपई कोकोनट कुल्फी

साहित्य : २ कप पपईचा गर, १ कप किसलेले ओले खोबरे किंवा मलई, १/२ कप बारीक वाटलेली काजू पावडर, १ कप मध, २-३ थेंब गुलाबाचा अर्क.

सजावटीसाठी : गुलाबाच्या पाकळ्या.

कृती :  सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर, किसलेले ओले खोबरे किंवा मलई, काजू पावडर, मध व दोन-तीन थेंब गुलाबाचा अर्क घाला.मिश्रण मऊसूत होईपर्यंत ब्लेंड करा.एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ब्लेंड केलेले हे मिश्रण पसरवून पाच ते सहा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.तयार झालेल्या कुल्फीचे त्रिकोणी काप करा. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैशाली अडसूळे, बंगळूर