टरबुजाचा लाडू | सविता मेत्रेवार, हिंगोली | Watermelon Ladoo | Savitra Metrevar

Published by सविता मेत्रेवार on   January 30, 2021 in   2021Recipes

 

टरबुज चा लाडू

साहित्य : १/४ कप टरबुजाचा शिजविलेला गर, ३ चमचे मिल्क पावडर, ३ चमचे साखर, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ चमचा तूप, १५ काजू-बदाम, २ वेलच्या, मनुके.

कृती : सर्वप्रथम काजू, बदाम व वेलची मिक्सरमधून वाटून घ्या. तूप गरम करून त्यात टरबुजाचा गर, मिल्क पावडर व साखर घाला. साखर विरघळल्यानंतर काजू-बदाम पूड, वेलची व खोबऱ्याचा कीस घाला. मिश्रण चांगले एकजीव करा. मिश्रणाला लालसर रंग आल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून लाडू वळा. ड्रायफ्रूट्सने सजवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


सविता मेत्रेवार, हिंगोली