कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक | कौस्तुभ नलावडे, पुणे | Watermelon Rind Cup Cake | Kaustubh Nalawade, Pune

Published by कौस्तुभ नलावडे, पुणे on   April 30, 2021 in   2021Paknirnay Recipe

कलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक

साहित्य : २ वाट्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा गर, १ वाटी हिरवे मूग, १ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरभरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, १ चमचा किसलेले आले, १/२ कप पोहे, आवश्यकतेनुसार मीठ.

फोडणीचे साहित्य : कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, ओले खोबरे (सजावटीसाठी).

कृती : मूग, तांदूळ व सर्व डाळी स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये तीन ते चार तास भिजत ठेवा. भिजलेले मूग व सर्व डाळी पाण्यामधून निथळून मिक्सरमध्ये मिरची-आले घालून वाटून घ्या. हे मिश्रण दहा तास आंबवण्यासाठी गरम जागी ठेवा. मिश्रण आंबल्यावर त्यामध्ये दहा मिनिटे भिजवून वाटलेले पोहे मिक्स करा. आता या मिश्रणात एक चमचा सोडा व थोडे मीठ घालून फेटून घ्या. यात कलिंगडाच्या सालीचा पांढरा गर घालून मिक्स करा. नंतर सिलिकॉनच्या कप मोल्डला तेल लावून हे मिश्रण कप केक मोल्डमध्ये भरा. एका बेकिंग ट्रेमध्ये पाणी घेऊन हे कप केक त्यामध्ये ठेवून वीस मिनिटे १८० डिग्री सेल्सिअसला बेक करा. मोल्ड ओव्हनमधून काढून त्यावर फोडणी घालून, कोथिंबीर व खोबरे घालून सजवा आणि चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कौस्तुभ नलावडे, पुणे