चिंचे | Puliyogare masala | Saee Koranne | Tamarind Rice | puliyogare rice | tamarind rice recipe | tamarind rice | puliyogare powder | puliyodharai powder

पुलियोगारे मसाला (चिंचभाताची पेस्ट) | सई कोरान्ने | Puliyogare masala | Saee Koranne

पुलियोगारे मसाला (चिंचे भाताची पेस्ट)

साहित्य : २ कप चिंचे चा कोळ, १/२ कप गूळ, १ मोठा चमचा तीळ, १/२ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा जिरे, १ मोठा चमचा लाल मिरची पावडर, १/४ कप शेंगदाणे, १ मोठा चमचा चणाडाळ, ८-१० कढीपत्त्याची पाने, २ मोठे चमचे वनस्पती तेल, १ मोठा चमचा मोहरी, ४-५ सुक्या मिरच्या, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ.

कृती : जाड तव्याच्या कढईत चिंचेचा कोळ आणि गूळ घालून एक उकळी काढून घ्या. गॅस कमी करून तो घट्ट होईपर्यंत उकळत राहा. त्याचा दाटसरपणा पीनट बटरसारखा असावा. दरम्यान, धणे, जिरे आणि तीळ तव्यावर भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यांची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट उकळत्या चिंचे च्या कोळात घाला. त्यात मीठ आणि लाल मिरची पावडर घाला. एका वेगळ्या कढईत तेल तापत ठेवा. त्यात मोहरी, चणाडाळ, शेंगदाणे आणि सुक्या मिरच्या तोडून घाला. डाळ गुलाबी होईपर्यंत मिनिटभर परतवून घ्या. त्यात कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हिंग घाला. ही फोडणी  चिंचेच्या कोळात घालून ढवळून घ्या. थंड करून हवाबंद डब्यात भरा. स्टीम राइस आणि तुपासह किंवा या पेस्टमध्ये भात टॉस करा आणि गरम करून सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– सई कोरान्ने

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.