कठळ शामी कबाब (शाकाहारी-मांसाहारी स्नॅक्स) | कुमारी एस., हैदराबाद | Kabab | Kalnirnay Recipe

Published by कुमारी एस., हैदराबाद on   June 22, 2019 in   2019Food Corner

 

साहित्य : ३०० ग्रॅम कच्चा फणस, प्रत्येकी १ हिरवी आणि काळी वेलची, २ काळीमिरे, १ लवंग, अर्धा इंच दालचिनी, ३ लाल मिरच्या, ३ चमचे चणाडाळ (अर्धा तास पाण्यात भिजवलेली), १ बारीक चिरलेला कांदा, /२ इंच आले, ३ चमचे बेसन, (भाजलेले), २ चमचे ताजी मलई, /२ लिंबाचा रस, मीठ, २ चमचे तेल, २ चमचे घी (कबाब तळण्यासाठी).

 

कृती : प्रेशर कुकरमध्ये तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यात सर्व गरम मसाला (लवंग, वेलची, दालचिनी, काळीमिरे) टाका. गरम मसाला तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा, फणसाच्या फोडी आणि चणाडाळ तसेच लाल मिरच्या, मीठ आणि आल्याचे तुकडे टाका. आता त्यात अर्धा कप पाणी टाकून कुकरच्या दोन शिट्टया काढून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या. या मऊशार पेस्टमध्ये मलई आणि लिंबाचा रस घाला हे सगळे मिश्रण चांगले मळून घ्या आणि डब्यात भरून ठेवा. डब्यात भरलेल्या या मिश्रणाच्या मध्ये कोळशाचे जळते निखारे ठेऊन धुनकार घ्या. हे करताना अर्ध्या तासासाठी डब्याचे झाकण बाहेरून पीठ लावून बंद करा. कबाब बनविण्यासाठी आता हे मिश्रण तयार झाले आहे. ह्या मिश्रणाच्या छोट्या टिक्की बनवून नॉनस्टिक तव्यावर थोड्या तुपावर भाजून घ्या. हिरव्या चटणीबरोबर गरमागरम हे कबाब सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कुमारी एस., हैदराबाद