मँगो मालपोवा | Mango Malpua Recipe

Published by कालनिर्णय on   May 4, 2019 in   2016Food Cornerमराठी लेखणी

मँगो मालपोवा

  • साहित्य :

१ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे.

  • कृती : 

एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम तेलात मंद आचेवर या मिश्रणाचे मालपोवे तळून घ्यावेत आणि साखरेच्या पाकात टाकावे. दहा-पंधरा मिनिटांनी डिशमध्ये काढून त्यावर आंब्याचे तुकडे आणि रबडी टाकून डिश सर्व्ह करावी.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या………………………………..